INDW vs WIW: Harleen Deol चे शानदार शतक; स्मृती, प्रतिका, जेमिमा यांची फिफ्टी, भारताच्या वन-डेतील सर्वोत्तम धावा

INDW vs WIW 2nd ODI : भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावा उभारल्या आहेत. भारताची वन-डे मधील ही संयुक्तपणे सर्वोत्तम धावसंख्या आहे.
harleen deol
harleen deolesakal
Updated on

Harleen Deol Century INDW vs WIW 2nd ODI: वेस्ट इंडिजविरूद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारताने प्रथम फलंदाजी करत ३०० पार धावसंख्या उभारली. सुरूवातीपासूनच भारतीय फलंदाज चांगल्या लयमध्ये दिसून आल्या. स्मृती मानधना, प्रतिका रावल व जेमिमाह रॉड्रीग्स यांच्या अर्धशतकांना हर्लिन देओलच्या शतकाची जोड मिळाली आणि भारतीय संघाने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३५९ धावांचे तगडे लक्ष्य दिले. वन-डेमधील भारताची ही आत्तापर्यंतची संयुक्तपणे सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे. २०१७ भारतीय संघाने आर्यलॅंडविरूद्ध २ बाद ३५८ धावा केल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com