

INDW vs WIW 2nd ODI : भारतीय महिला संघाने विजयसाठी दिलेले ३५९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला पूर्ण करता आले नाही आणि भारताने सामन्यात ११५ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत २-०ने आघाडी घेत भारतीय संघाने मालिकाही आपल्या नावे केली आहे. हेली मॅथ्यूजने शतकी खेळी करत लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला पण तिला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही त्यामुळे वेस्ट इंडिजला हा सामना गमवावा लागला.