IPL 2025 Auction | Vaibhav Suryavanshi | Rahul DravidSakal
Cricket
IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी
Vaibhav Suryavanshi in IPL Auction 2025: आयपीएल २०२५ लिलावात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. त्याला संघात का घेतलं यामागील कारण राहुल द्रविडने सांगितले आहे. याशिवाय वैभवच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Dravid on Vaibhav Suryavanshi : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. या लिलावात बिहारच्या १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास घडला आहे. ज्यावेळी अनेक मोठे स्टर अनसोल्ड जात असताना मात्र वैभवसाठी कोटींची बोली लागली.
त्याच्यासाठी आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघ उत्सुक दिसत होते. पण अखेर राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर १.१ कोटींची बोली लावली आणि त्याला संघात घेतलं. खरंतर वैभव लिलावातील सर्वात लहान खेळाडू होता. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील लिलावात विकला गेलेलाही सर्वात युवा खेळाडू ठरला.