IPL Retention 2025esakal
Cricket
IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!
IPL 2025 Players List: इंडियन प्रीमिअर लीग २०२५च्या मेगा ऑक्शनची तयारी जोरात सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या ऑठवड्यात ऑक्शन होण्याचा अंदाज आहे.
IPL 2025 Auction Pool: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लिलावापूर्वी फ्रँचायझीला रिटेन केलेल्या म्हणजेच संघात कायम राखलेल्या ६ खेळाडूंची नाव जाहीर करावी लागणार आहेत. BCCI ने त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सहा खेळाडूंसाठी बीसीसीआयने फ्रँचायझीला काही बजेट ठरवून दिला आहे आणि त्यानुसार त्यांना खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. पण, हा बजेट फ्रँचायझीला हवा तसा वापरता येणार आहे. वृत्तानुसार १८,१४,११,१८,१४ कोटी अशी रक्कम BCCI ने फ्रँचायझींना त्यांच्या प्रथम ते पाचव्या क्रमांकापर्यंतच्या पसंतीच्या खेळाडूंसाठी ठऱवली होती. पण, त्यात बदल करताना ७५ कोटींचा बजेट कसा वापरायचा हा निर्णय फ्रँचायझीवर सोपवला गेला. त्याचा वापर करून सनरायझर्स हैदराबादने मोठी खेळी खेळली आहे आणि त्यामुळेच इतर मंडळी बंडाला उतरली आहे.

