Mumbai Indian IPL 2025 Full Schedule : मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना CSK शी! 'MI पलटण' चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

MUMBAI INDIAN FULL SCHEDULE SQUAD CAPTAIN IPL 2025 : मागील पर्वात हार्दिकच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळताना Mumbai Indians ला तालिकेत आठव्या क्रमांकावर राहावे लागले होते. हार्दिकला नेतृत्व दिल्याने भरपूर टीका झाली, चाहत्यांनी स्टेडियममध्ये हार्दिकला ट्रोल केले.
MUMBAI INDIAN FULL SCHEDULE
MUMBAI INDIAN FULL SCHEDULE esakal
Updated on

Everything We Know About IPL 2025 Schedule : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आपला दरारा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने हार्दिक, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या स्टार्सना संघात कायम राखले होते आणि त्यानंतर लिलावात आणखी तगडे साथीदार जोडले. त्यामुळे यंदा MI कडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागील पर्वात हार्दिकच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळताना Mumbai Indians ला तालिकेत आठव्या क्रमांकावर राहावे लागले होते. हार्दिकला नेतृत्व दिल्याने भरपूर टीका झाली, चाहत्यांनी स्टेडियममध्ये हार्दिकला ट्रोल केले. पण, फ्रँचायझी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिली आणि याही पर्वात तोच मुंबईचा कर्णधार असणार आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. २३ मार्चला चेन्नईच्या चेपॉकवर हा सामना होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com