IPL 2025 मध्ये एका सामन्यासाठी 'बाहेर'चा खेळाडू खेळणार; ज्याने नाव नोंदवलेलं नाही, त्याचं नशीब फळफळणार, सॉलिड मजा येणार

IPL 2025 new replacement rule for teams : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मोठा नियम बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व १० संघांना याबाबत सूचि केले आहे. आता एका सामन्यासाठी अनरजिस्टर्ड खेळाडूला रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळू शकते. म्हणजेच, ज्या खेळाडूने आयपीएलसाठी नाव नोंदवले नाही, त्यालाही संधी मिळू शकते.
IPL REPLACEMENT RULES: OUTSIDER PLAYER IS ALLOWED
IPL REPLACEMENT RULES: OUTSIDER PLAYER IS ALLOWED esakal
Updated on

BCCI’s New Rule Allows Unregistered Players as Replacements : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धा तोंडावर आली असताना याची उत्सुकता वाढवण्यासाठी BCCI ने मोठं पाऊल उचललं आहे. मागच्या वर्षी आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन घेतलं गेलं आणि त्यात प्रत्येक संघांनी त्यांना अपेक्षित खेळाडूंवर तगडी बोली लावून आपल्या संघाची मजबूत बांधणी केली. २२ मार्चपासून कोलकाता नाइट रायडर्स जेतेपदाचा ताज कायम राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे. त्याचवेळी हॅरी ब्रूक सारख्या तगड्या खेळाडूने माघार घेतल्याने नव्या नियमानुसार त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. त्यात BCCI ने आणखी एक नवीन नियम आणला आहे आणि त्यानुसार फ्रँचायझीला एका सामन्यासाठी 'बाहेर'चा खेळाडू खेळवता येणार आहे. आता हा बाहेरचा खेळाडू म्हणजे काय आणि त्यासाठीच्या अटी व शर्थी काय हे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com