

Shreyas Iyer injury update IPL 2026
esakal
Will Shreyas Iyer play vs CSK tomorrow? गतउपविजेत्या पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवला. पण, या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याच्या मनगटाला दुखापत झाली. फलंदाजाने जोरात मारलेला चेंडू नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या श्रेयसच्या मनगटावर जोरात आदळला. तो वेदनेने विव्हळला आणि प्राथमिक उपचार घेऊन, काही काळ खेळलाही. पण, तो फार काळ फलंदाजी करू शकला नाही आणि १८ धावांवर झेलबाद झाला. श्रेयस आधीच दुखापतीतून सावरून आयपीएल २०२६ मध्ये दाखल झाला आहे आणि त्यात या नव्या दुखापतीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. अशात PBKS ला उद्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळायचे आहे. त्या सामन्यात श्रेयसच्या खेळण्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स हाती आले आहेत.