Rajasthan Royals Lucknow Super Giants 4 player trade IPL 2027
esakal
Rajasthan Royals Lucknow Super Giants 4 player trade IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ ची ट्रेड विंडो बंद होण्यास आता अवघ्या ११-१२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे आणि खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नावाची हवा असताना गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अनपेक्षित ट्रेड झाला. लियाम लिव्हिंगस्टन व जॅक एडवर्ड्स यांच्यासाठी CSK ने खलील अहमद व नॅथन एलिस यांना SRH कडे जाऊ दिले. पण, त्यापेक्षा मोठी ट्रेड आता चर्चेत आली आहे आणि ही राजस्थान रॉयल्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.