IPL 2027 Trade: दिवाळीच्या सफाईत चांगल्या वस्तू कचऱ्यात फेकल्या...! CSK च्या ट्रेडवर नेटिझन्सची सटकली; SRH ची ताकद वाढली

CSK FANS REACTION ON LIAM LIVINGSTONE TRADE : आयपीएल २०२७ पूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या चार खेळाडूंच्या ट्रेडची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
CSK fans reaction on Liam Livingstone trade IPL 2027

CSK fans reaction on Liam Livingstone trade IPL 2027

Updated on: 

SRH strengthen squad with Khaleel Ahmed and Nathan Ellis: हार्दिक पांड्याची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना निराश व्हावे लागले. इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वीच्या ट्रेडमधील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. CSK लियाम लिव्हिंगस्टोन व जॅक एडवर्ड्स यांना आपल्या ताफ्यात स्वस्तात दाखल करून घेतले. या दोघांसाठी अनुक्रमे ६ व ३ कोटी रुपये मोजले. पण, या दोघांसाठी त्यांनी सनरायझर्स हैदराबादला खलील अहमद व नॅथन एलिस हे दोन खेळाडू दिले आणि यावरून नेटिझन्सची सटकली आहे. दिवाळीच्या सफाईत चांगल्या वस्तू कचऱ्यात फेकून दिल्या, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत.

Loading content, please wait...