KL Rahul KKR trade rumours for IPL 2027
esakal
KL Rahul to Kolkata Knight Riders IPL 2027: हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव, इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये कर्णधाराच्या शोधात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळण्याची चर्चा रंगली आहे. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर KKR ला कर्णधार हवा आहे आणि मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक व सूर्याची घुसमट होत असल्याच्या चर्चा रंगवल्या गेल्या आहेत. अशात KKR हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचेही म्हटले गेले. पण, या दोन नावांमध्ये आणखी एक खेळाडू शर्यतीत आहे आणि तो म्हणजे KL Rahul... दिल्ली कॅपिटल्सचा हा खेळाडू IPL 2027 मध्ये कोलकाता फ्रँचायझीच्या कर्णधारपदाची रिक्त जागा भरू शकतो...