Delhi Capitals selection trials IPL 2027
Delhi Capitals selection trials IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या तयारीला वेग पकडला आहे. प्रत्येक फ्रँचायझीने मिनी ऑक्शनपूर्वी संघबांधणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही फ्रँचायझींनी निवड चाचणी शिबीर सुरू केले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या निवड चाचणीसाठी मुंबईचे चार खेळाडू बंगळुरूत दाखल झाले आहेत. या चारपैकी दोन खेळाडूंचा थेट यशस्वी जैस्वाल याच्याशी संबध आहे आणि त्यामुळे हे चौघो कोण, याची उत्सुकता लागली आहे.