IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

CSK and SRH four player trade deal IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मोठा ट्रेड करत आपल्या संघात दोन दमदार खेळाडूंना सामील करून घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चार खेळाडूंची अदलाबदल झाली असून, या ट्रेडची अधिकृत घोषणा आयपीएलकडून करण्यात आली आहे.
CSK and SRH complete a four-player trade ahead of IPL 2027, with Liam Livingstone and Jack Edwards joining Chennai, while Khaleel Ahmed and Nathan Ellis move to Hyderabad.

CSK and SRH complete a four-player trade ahead of IPL 2027, with Liam Livingstone and Jack Edwards joining Chennai, while Khaleel Ahmed and Nathan Ellis move to Hyderabad.

Sakal

Updated on: 

Chennai Super Kings new players for IPL 2027: चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ पूर्वी हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेईल असे वाटले होते. पण, त्यांनी हार्दिकला ठेंगा दाखवला आहे. CSK ने सनरायझर्स हैदराबादकडून लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स या दोन तगड्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आयपीएल २०२६ च्या आधी SRH ने लिव्हिंगस्टोनला १३ कोटींना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. त्या हंगामात त्याने संघासाठी दोन सामने खेळून १५ धावा केल्या होत्या. लिव्हिंगस्टोनच्या खराब फॉर्ममुळे तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर राहिला.

Loading content, please wait...