MS Dhoni role in CSK for IPL 2027
esakal
MS Dhoni player or mentor for CSK IPL 2027? चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्टीफन फ्लेमिंग याच्यानंतर CSK च्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाकडे जाईल, याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी महेंद्रसिंग धोनीच योग्य व्यक्ती असल्याचे अनेकांचे मत होते आणि कॅप्टन कूलचं वय पाहता तो पुढल्या वर्षी याच भूमिकेत दिसेल असा सर्वांना विश्वास होता. पण, सोमवारी चेन्नई फ्रँचायझीने भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान ( Zaheer Khan) याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करून सर्वांना आश्चर्यचकित केले. झहीरकडे प्रशिक्षणाचा अनुभव असल्याने तोच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे फ्रँचायझीकडून सांगण्यात आले.