When will IPL 2027 retention list be announced?
esakal
IPL 2027 retention list date, time and live streaming in India : इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या मिनी ऑक्शनपूर्वी आजचा दिवस सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई इंडियन्स (MI), चेन्नई सुपर किंग्स (CSK), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यासह सर्व १० फ्रँचायझी आज, १७ नोव्हेंबर रोजी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करणार आहेत. या यादीमुळे कोणते खेळाडू संघात कायम राहणार आणि कोणाला मिनी ऑक्शनमध्ये उतरावे लागणार, हे स्पष्ट होईल.