IPL 2027 Trade : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना सूर्यकुमार यादवच्या ट्रेडचा 'बाऊन्सर' पडला; Mumbai Indians ने काय निर्णय घेतला?

Suryakumar Yadav trade update IPL 2027: आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या ट्रेडची चर्चा सुरू असतानाच आता सूर्यकुमार यादवच्या ट्रेडबाबतही चर्चांना उधाण आले होते.
Suryakumar Yadav Trade Rumours

Mumbai Indians have ruled out the possibility of trading Suryakumar Yadav amid ongoing speculation surrounding Hardik Pandya's IPL 2027 future

esakal

Updated on: 

Will Suryakumar Yadav leave Mumbai Indians in IPL 2027? इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पर्वापूर्वी ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे आणि त्यात हार्दिक पांड्याचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. हार्दिक नेमका कोणत्या संघात जाणार याचे गुढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. चेन्नई सुपर किंग्सपासून सुरू झालेली चर्चा कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स पासून ते आता पंजाब किंग्सपर्यंत पोहोचली आहे. PBKS सोबतची MI ची डिल जवळपास निश्चित झाल्याचा दावा केला जातोय.. पण, ही चर्चा सुरू असताना Mumbai Indians सूर्यकुमार यादवला ट्रेड करणार असल्याचे वृत्त आले आणि त्यावर फ्रँचायझीने अखेर बाऊन्सर टाकलाच...

Loading content, please wait...