HARDIK PANDYA TRADE : हार्दिक कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार? बदल्यात Mumbai Indians ने केलीय २ तगड्या खेळाडूंची मागणी?

IPL 2027 Hardik Pandya trade latest news: आयपीएल २०२७ पूर्वी हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Will Hardik Pandya play under Rohit Sharma again?

Hardik Pandya trade from Mumbai Indians to Kolkata Knight Riders

esakal

Updated on: 

Hardik Pandya KKR captain for IPL 2027: हार्दिक पांड्या नेमकं कोणत्या संघाकडून आयपीएल २०२७ मध्ये खेळणार, हे काही केल्या निश्चित होताना दिसत नाही. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची कामगिरी मागील तीन पर्वात काही खास झाली नसली तरी त्याला पुन्हा संघात घेण्याचा निर्णय हा फ्रँचायझीचाच होता. आता त्यांचे डावपेच अपयशी ठरले आणि हार्दिकसोबत फिसकटले... त्यामुळे हार्दिकही पर्याय शोधतोय, हे खरे असले तरी तो नेमका कुठे चाललाय, याबाबत रोज नवीन फ्रँचायझींची नावं समोर येतायेत... चेन्नई सुपर किंग्सपासून सुरू झालेली ही चर्चा आता पंजाब किंग्सपर्यंत येऊन थांबली आहे. पण, आता कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...