Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Hardik Pandya wants to return to Gujarat Titans as captain : IPL 2027 पूर्वी हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिकने आपल्या जुन्या फ्रँचायझी गुजरात टायटन्समध्ये परतण्याबाबत चर्चा केल्याचे समोर आले आहे.
Hardik Pandya wants to return to Gujarat Titans as captain

Hardik Pandya wants to return to Gujarat Titans as captain

esakal

Updated on

Hardik Pandya captaincy condition for Gujarat Titans return: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला घरवापसीचे स्वप्न पडू लागले आहेत. २०२४ मध्ये गुजरात टायनट्स सोडून पुन्हा MI च्या ताफ्यात आलेल्या हार्दिकला मागील तीन पर्वात कर्णधार व खेळाडू म्हणून अपयश आले. त्यामुळे IPL 2026 सुरू असतानाच त्याने वेगवेगळ्या फ्रँचायझीसोबत चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स या अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यास उत्सुक असल्याच्या अफवाही आहेत. पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार हार्दिकला पुन्हा GT कडे जायचंय... त्याने कर्णधारपदाची मागणीही केली आहे, मग अशात शुभमन गिल ( Shubman Gill) याचं काय होईल, असा प्रश्न आहेच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com