Kolkata Knight Riders Hardik Pandya trade news
esakal
Hardik Pandya leaving Mumbai Indians reports: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, हे निश्चित आहे. पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार, याचे गणित काही सुटताना दिसत नाही. लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींच्या रिषभ पंतला १५ कोटींत दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रिषभसाठी त्यांनी कुलदीप यादवला १३.५ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. आता यानंतर हार्दिकच्या ट्रेडची चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनुसार हार्दिक राजस्थान रॉयल्सकडे जाईल आणि यशस्वी जैस्वाल MI कडे येईल, अशी चर्चा होती. पण, आता नव्या संघाने उडी मारली आहे आणि त्यामुळे मराठमोठ्या खेळाडूवर अन्याय होऊ शकतो.