Pakistan cricketers may miss The Hundred 2026 auction
esakal
Why Pakistan players are not in The Hundred 2026 auction? भारताशी पंगा घेणे पाकिस्तानी खेळाडूंना किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता येताना दिसतेय.. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० व कॅरेबियन प्रीमिअर लीग मध्ये इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंकडे पाठ फिरवली असताना आता आणखी एका लीगमधून पाकड्यांना थारा दिला जाणार नाही. द हंड्रेड २०२६ लीगमधील मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, साऊदर्न ब्रेव्ह व सनराईस लीड्स या चार संघांमध्ये आयपीएल फ्रँचायझींची गुंतवणूक आहे. या चारही संघांनी लिलावात पाकिस्तानी खेळाडूंवर बोली न लावण्याचा पवित्रा घेतला आहे.