
Indian Government Tax: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे मेगा ऑक्शन नुकतेच पार पडले आणि त्यात लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत याच्यासाठी २७ कोटींची बोली लावली. ऋषभ हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. याच मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती.पण, काही क्षणातच श्रेयसचा महागड्या खेळाडूचा मान ऋषभला मिळाला. इंडियन प्रीमिअर लीगच्या या मेगा लिलावात १८२ खेळाडूंसाठी ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले गेले. ऋषभसाठी २७ कोटींची बोली लागली असली तरी त्याच्यावरही कर कपातीची कात्री चालणार आहे.