IPL 2025 Auction
IPL 2025 Auction Sakal

हा इकडे, तो तिकडे! IPL 2025 पूर्वी अफवांचा सुळसुळाट; सूर्या, रोहित यांचेही त्यात नाव

IPL Mega auctions 2025 Trade Rumours: आयपीएल २०२५ हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे सर्वच संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अशात सध्या अनेक खेळाडूंबाबत चर्चांना उधाणही आले आहे.
Published on

IPL Mega auctions 2025 Trade Rumours : इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगाम सुरू होण्यापूर्वीच बराच चर्चेत आलाय. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयचे सर्व फ्रँचायझींबरोबर बैठकही झाली आहे. त्यामुळे आता या ऑक्शनबाबतच्या अपडेट्स लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

याचदरम्यान, गेल्या काही दिवसात अनेक खेळाडूंबाबत चर्चा होताना दिसत आहेत. विविध रिपोर्ट्सनुसार मोठे बदल प्रत्येक संघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच अशा चर्चांबद्दल जाणून घेऊ.

रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२५ स्पर्धेत दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. आयपीएल २०२४ पूर्वी त्याचे कर्णधारपद मुंबई इंडियन्सने काढून घेत ते हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघात नाराजी असल्याचंही म्हटलं जात होतं.

IPL 2025 Auction
मी IPL च्या ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत...; रोहित शर्माचा Mumbai Indians ला अप्रत्यक्ष इशारा?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com