Ankeet Chavan to Coach Mumbai’s U-14 Team
इंडियन प्रीमिअर लीग २०१३ चे स्पॉट-फिक्सिंग प्रकरण प्रचंड गाजले होते. या घटनेमुळे चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझींवर दोन वर्षांची बंदी घातली गेली होती. या प्रकरणामुळे कारकीर्द अकाली संपुष्टात आलेला अंकित चव्हाण याला आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) U-14 संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केला आहे. २०१३ च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाण, अजित चंडिला आणि एस. श्रीसंत यांच्यासोबत त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.