Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Hardik Pandya IPL trade latest news: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएलच्या ट्रेड विंडोमधील सर्वात चर्चेचा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक हंगामानंतर हार्दिकने संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून, त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी तब्बल सात फ्रँचायझींमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
Hardik Pandya IPL trade latest news

Hardik Pandya IPL trade latest news

esakal

Updated on

IPL 2027 trade window Seven franchises want Hardik Pandya : हार्दिक पांड्या हा इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या ट्रेड विंडोमध्ये सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू बनला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला मागील तीन पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही आणि त्यामुळेच तो MI ची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. ३२ वर्षीय हार्दिकला फ्रँचायझीला अपेक्षित निकाल देता आलेला नाही आणि त्यामुळे व्यवस्थापनही नाराज आहे. अशात हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल सात फ्रँचायझी शर्यतीत असल्याची बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com