Ireland vs West Indies 2025 T20I series highlights and stats
वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रेकॉर्ड ब्रेकींग खेळ पाहायला मिळाला. रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात एकूण ४५० धावा झाल्या आणि वेस्ट इंडिजने आयर्लंडला ६२ धावांनी पराभूत केले. या विजयासह विंडीजने मालिका १-० अशी जिंकली. एकीकडे एव्हीन लुईसने सामन्यात वादळी खेळी केली, तर दुसरीकडे आयर्लंडचा युवा वेगवान गोलंदाज लियाम मॅकार्थीने पदार्पणात नकोसा विक्रम नावावर केला.