
Irfan Pathan React On Virat Kohli Bad Performance : ऑस्ट्रेलियाने तब्बल १० वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मालिकेतील अंतिम सिडनी कसोटी सामना भारताने ५ विकेट्सने गमावला व ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-१ ने बाजी मारली. संपुर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. ज्यामध्ये संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहलीला पर्थ कसोटी वगळता मालिकेत मोठी खेळी करता आली नाही. विराट मालिकेमध्ये सातत्याने एकाच पद्धतीने बाद झाला. भारतीय वरिष्ठ खेळाडूच्या या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडू व समालोचक इरफान पठानणने विराट कोहलीचे कान टोचले आहेत.