
Rahul Dravid Temperament: राहुल द्रविड, हे नाव उच्चारलं तरी एक शांत, सरळ आणि सभ्य व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो. भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगादान देणारं हे एक नाव. पण काही वर्षांपूर्वी त्याची एक जाहिरात आली होती, जी खूप चर्चेत आली होती, ज्यामध्ये राहुल द्रविड ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना प्रचंड चिडून बॅट उंचावून मी इंदिरानगरचा गुंड असल्याचे सांगत होता.
त्याचं हे रुप जाहिरातीतील असले, तरी ते पाहून अनेक जणांना आश्चर्य वाटले होते, कारण द्रविडला फारच क्वचित चिडलेला अनेकांनी पाहिलेलं आहे. त्याचा शांत आणि सभ्य स्वभाव हीच त्याच्या व्यक्तीमत्वाची ओळखही आहे. पण तो मैदानात जसा संयमी असतो, तसाच घरीही असतो का याबाबत त्याच्या पत्नी विजेता यांनी खुलासा केला होता.