Babar Azam च्या कारकीर्दिला पूर्णविराम? पाकिस्तानने संघातून केली हकालपट्टी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर झाला 'गेम'

Pakistan Announce ODI Squad Without Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यात बाबर आझमला स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
BABAR AZAM DROPPED FROM PAKISTAN ODI SQUAD FOR BANGLADESH SERIES

BABAR AZAM DROPPED FROM PAKISTAN ODI SQUAD FOR BANGLADESH SERIES

esakal

Updated on

Babar Azam Omitted from Pakistan’s 15-Member ODI Squad: पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही आणि नेट रन रेटमुळे त्यांना माती खायला लागली. आता पाकिस्तानने २०२७ साली होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांच्या वन डे वर्ल्ड कप योजनेत बाबर आझमला स्थान नसेल, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने वन डे संघातून बाबर आझमची हकालपट्टी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com