BCCI Annual Contract : बीसीसीआय करार गमावला तरी अय्यर अन् किशन भारतीय संघाकडून खेळू शकतात?

Shreyas Iyer Ishan Kishan BCCI : इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे टी 20 वर्ल्डकप खेळू शकणार का नाही?
Ishan Kishan and Shreyas Iyer
Ishan Kishan and Shreyas Iyer esakal

BCCI Annual Contract Ishan Kishan and Shreyas Iyer : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने 2023-24 च्या वार्षिक करारातून वगळलं आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने रणजी ट्रॉफी न खेळण्याची शिक्षा दिली आहे असं बोललं जात आहे. बीसीसीआयने एकप्रकारे सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्याचा इशाराच दिला आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यानंतर आता श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना टीम इंडियाचे देखील दार बंद झाले असेल असा समज आपल्या सर्वांचा झाला असेल. मा६ असं नाहीये. अय्यर आणि किशनसाठी संघात परतण्याचे सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत.

Ishan Kishan and Shreyas Iyer
KL Rahul IND vs ENG 5th Test : राहुल आऊट तर बुमराह... पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघ केला अपडेट

जरी श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बीसीसीआयच्या करारातून डच्चू देण्यात आला असला तरी ते अजूनही भारतीय संघाकडून खेळू शकतात. अशा परिस्थितीत जर अय्यर किंवा इशान किशन भारतीय संघात निवडले गेले तर त्यांना कराराची रक्कम नाही मात्र मॅच फी नक्की मिळू शकते.

बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर कारवाईची कुऱ्हाड चालवत त्यांचा वार्षिक करार पुढे वाढवला नाही. राहुल द्रविड आणि जय शहा यांनी रणजी ट्रॉफी खेळण्याचा इशारा देऊन देखील त्यांनी त्याकडे कानाडोळा केला अन् रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली.

Ishan Kishan and Shreyas Iyer
Irfan Pathan : 'भारतीय क्रिकेट सुधारायचं असेल तर...' हार्दिक पांड्यावरून इरफानने BCCIला दिला मोठा सल्ला

बीसीसीआयने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केलं की, 'श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा अनेक शिफारसींचा विचार करत बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आलेला नाही.' बीसीसीआय पुढे म्हणते की, 'बीसीसीआयचा सर्व खेळाडूंना सल्ला आहे की ज्यावेळी ते देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि ते तंदुरूस्त आहेत अशावेळी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास प्राधान्य द्या.'

इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे बीसीसीआय कराराला मुकले आहेत. त्यामुळे त्यांचे आयसीसी टी 20 वर्ल्डकप संघात निवडले जाणे अत्यंत अवघड झालं आहे. आता या दोघांचा विचार संघनिवडीवेळी केला जाणार नसल्याचं मानलं जात आहे. जरी अय्यर आणि किशनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरी त्यांची संघात समावेश होण्याची शक्यता फार कमी राहिली आहे.

अय्यर अन् किशन भारतीय संघात कसे खेळतील?

अय्यर आणि किशन भारतीय संघात अजूनही खेळू शकतात. मात्र त्यांनी कराराला पात्र होण्यासाठी जितके सामने खेळले आहेत ते खेळून देखील त्यांना बीसीसीआयचा करार मिळणार नाही.

करारासाठी पात्र होण्याकरिता या दोघांना 10 टी 20 किंवा 8 वनडे किंवा 3 कसोटी सामने खेळावे लागणार आहेत.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com