'जे आता शिवीगाळ करत आहे ते उद्या...', टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने हार्दिक पांड्याबाबत केला मोठा खुलासा

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चाहत्यांचा लाडका झाला.
ishan kishan on hardik pandya
ishan kishan on hardik pandyasakal

Ishan Kishan on Hardik Pandya : भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चाहत्यांचा लाडका झाला. दोन महिन्यांपूर्वी आयपीएल दरम्यान हार्दिक पांड्याला लोक ट्रोल करत होती आणि गेले सहा महिने त्याच्यासाठी कठीण गेले आहेत. दरम्यान टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज इशान किशनने हार्दिक पांड्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

ishan kishan on hardik pandya
Zim vs Ind : मॅच जिंकली तरी शुभमन गिल चिंतेत! वर्ल्ड कप विजेत्या संघातील 3 खेळाडू ताफ्यात सामील, आता कोण होणार बाहेर?

खरं तर, आयपीएल 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आलं होतं, तेव्हा हार्दिकवर बरीच टीका झाली होती. हार्दिक पांड्याला सोशल मीडियापासून स्टेडियमपर्यंत सर्वत्र ट्रोल करण्यात आले होते.

त्यामुळे हार्दिकची स्वत:ची कामगिरीही पण चांगली नव्हती आणि मुंबई इंडियन्सही तळात राहिली. त्यामुळे हार्दिक टीकाकारांच्या निशाण्यावर आला. मात्र, यानंतर हार्दिकने टी-20 वर्ल्ड कपमध्ये जाऊन भारतासाठी चांगली कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ishan kishan on hardik pandya
Euro Cup 2024 : नेदरलँड्सचे पिछाडीवरून शानदार पुनरागमन! तुर्कस्तानविरुद्ध सहा मिनिटांत दोन गोल, वीस वर्षांनंतर युरो करंडकात उपांत्य फेरी

हार्दिक पांड्याबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना इशान किशन म्हणाला की, मला आतून जाणवत होतं की, हार्दिक वर्ल्ड कपसाठी आपले सर्वोत्तम राखून ठेवत आहे, त्याचे ते शब्द मी कधीही विसरणार नाही. ते म्हणाले होते की, मी परफॉर्म करायला सुरुवात केली की आज जे लोक शिव्या देत आहेत तेच उद्या टाळ्या वाजवतील.

पुढे तो म्हणाला की, मीही कठीण प्रसंगातून जात असताना त्यांनी मला हेच सांगितलं. तो म्हणाला की लोकांना बोलू द्या, आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ आणि सामन्यात 100 टक्के देण्याचा प्रयत्न करू. हार्दिक पांड्यासाठी गेले 6 महिने खूप कठीण गेले, जे स्पष्ट करणे कठीण आहे. त्याच्याबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले. पण कधी तो कधीच रागावला नाही. बडोद्यातील प्रशिक्षणापासून जवळपास सर्वत्र मी त्याच्यासोबत होतो, पण माझ्यासोबत असे का होत आहे हे त्याने कधीच सांगितले नाही. त्याने फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com