Ishan Kishan scores 87 for Nottinghamshire vs Yorkshire
भारतीय संघाबाहेर असलेल्या इशान किशनने इंग्लंडचे मैदान गाजवले आहे. यष्टिरक्षक-फलंदाजाने काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणात वादळी खेळी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. त्याची ही खेळी बीसीसीआयला त्याच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडणारी ठरू शकते. किशनने नॉटिंघमशायरसाठी काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात त्याने वादळी खेळी केली.