Ishan Kishan Ranji Trophy : इशन किशनचं चाललंय तरी काय...? पुन्हा बीसीसीआयचा आदेश झुगारला

Ishan Kishan
Ishan Kishan sakal

Ishan Kishan Ranji Trophy : टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळावं त्यानंतरच त्याचा टीम इंडियातील निवडीसाठी विचार केला जाईल असं सांगितलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने देखील प्रत्येक कराबद्ध आणि फिट असलेल्या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धामंध्ये सहभाग घ्यावा असं सांगितलं होतं.

मात्र इशान किशनने बीसीसीआयच्या या आदेशाकडे पुन्हा एकदा कानाडोळा केलाय. झारखंडकडून खेळणाऱ्या इशान किशनने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीतील सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असल्याचे सांगितल्यानंतरही इशान किशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इशान किशनचं नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Ishan Kishan
Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : टीम इंडियाचा 445 वर पहिला डाव खल्लास! ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले, शेवटी बुमराहचा तडाखा

नुकतेच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं की बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणं बंधनकारक आहे. ते म्हणाले की, जर तुम्ही फिट असाल तर देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याबाबतचं कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही.

इशान किशन रणजी खेळणारच नाही?

इशान किशनने पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी न खेळणे पसंत केलं आहे. तो किरण मोरे अकॅडमीत सराव करतोय यावरून तो फिट असल्याचं बोललं जात आहे. त्याने यापूर्वी मानसिक थकव्याचं कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक घेतला होता.

इशान किशनने रणजी न खेळण्याचा निर्णय हा वैयक्तिक कारणाने घेतला असल्याचे सांगितले. मात्र त्याची कृती ही बीसीसीआयच्या आदेशाविरूद्ध आहे. त्यामुळे याचा त्याच्या कारकिर्दीवर आणि टीम इंडियातील निवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Ishan Kishan
Ind vs Eng : अश्विनच्या चुकीचा टीम इंडियाला फटका, बॅटिंग करण्याआधीच इंग्लंडला मिळाल्या 5 धावा; नेमकं काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी निवडसमितीने ध्रुव जुरेल या युवा विकेटकिपर फलंदाजाला संधी दिली आहे. त्याने पहिल्याच सामन्यातच 46 धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केलं आहे. ऋषभ पंत फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो संघात आल्यानंतर तोच पहिली पसंती असेल. मात्र त्याचा बॅकअप म्हणून बीसीसीआय कसोटीत ध्रुव जुरेल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संजू सॅमसनचा विचार करू शकते.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com