
Jammu Kashmir beat Mumbai in Ranji Trophy 2025: जम्मू काश्मीर संघाने रणजी करंडक स्पर्धेत गतविजेत्या मुंबईला पराभवाची चव चाखवली. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर व शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय स्टार संघात असूनही मुंबईच्या वाट्याला पराभव आला. ११ वर्षानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरने मुंबईला त्यांच्याच घरी पराभूत केले आहे. याआधी २०१४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर जम्मू काश्मीरने ४ विकेट्स राखून मुंबईला नमवले होते.