

Mushtaq Ali Trophy
esakal
Jamshed Alam Creates History on His T20 Debut: एखाद्या खेळाडूला आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच चार विकेट्स मिळाल्या, तर यापेक्षा चांगली सुरुवात आणखी काय असू शकते? रेल्वेकडून खेळणाऱ्या २३ वर्षीय जमशेद आलमने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील टी२० पदार्पणात अशीच कामगिरी केली.
सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग चार चेंडूंवर चार फलंदाजांना बाद केलं. एवढंच नाही, तर अवघ्या ९ चेंडूंमध्ये पाच विकेट्स घेत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.