थोडक्यात : हार्दिक पांड्या आणि नताशाचा घटस्फोट गेल्या वर्षी झाला होता.घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाशी जोडलं गेलं.आता हार्दिक आणि जास्मिन यांचा ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत..भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही वर्षांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. गेल्यावर्षी त्याचा मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविचसोबत घटस्फोटही झाला. चार वर्षांच्या संसारानंतर हार्दिक आणि नताशा यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. त्यांनी त्यांचा मुलगा अगस्त्याचे पालकत्वही मिळून करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव एका दुसऱ्या मुलीशी जोडलं गेलं होतं. ही मुलगी म्हणजे ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया होय. .Hardik Pandya वर बीसीसीआय कारवाई करणार? पराभवानंतर ते कृत्य नको होतं करायला .हार्दिक आणि जास्मिन गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तथापि, त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य केले नव्हते. मात्र, गेल्या काही महिन्यात अनेक अशा घटना घडल्या, ज्यामुळे ते एकत्र असल्याचे म्हटले जात होते. आयपीएल २०२५ दरम्यानही जास्मिन मुंबई इंडियन्सच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये हजर राहिल्याचे दिसली होती. तिला स्टेडियममध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा अधिक रंगली होती..पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. अनेक युझर्सच्या मते हार्दिक आणि जास्मिन यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातही दुरावा आल्याचे चर्चा होत आहे. अनेक चाहत्यांनी असे कयास लावले आहेत की कदाचित दोघांचा ब्रेकअप झाला असावा किंवा त्यांना लोकांत्या चर्चेपासून लांब राहण्यासाठी एकमेकांना अनफॉलो केले आहे. .कोण आहे जास्मिन वालिया? जास्मिन वालिया ही ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे. तिने इंग्लीश, हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ती २०१७ मध्ये तिच्या बॉम डिग्गी या गाण्यामुळे चर्चेत आली होती. तिचे हे गाणे हिट झाले होते. .Hardik Pandya: MI कॅप्टन हार्दिकने शब्द पाळला, गुजरातच्या महिला क्रिकेटरला दिलं खास गिफ्ट; पाहा Video.ती २०१० साली ब्रिटनमधील रिऍलिटी शो 'द ओन्ली वे इज एसेक्स' मध्येही झळकली होती. तिने युट्यूबवर गाण्यांमधून मोठा फॅनबेस तयार केला होता. तिने ‘डम डी डी डम’, ‘गर्ल लाइक मी’, आणि ‘टेंपल’ यांसारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत. तिचे बॉम डिग्गी गाण्याचे ट्रॅक बॉलिवूड चित्रपट ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटात वापरण्यात आले होते. हे तिचे बॉलिवूडमधील पदार्पणही समजले जाते..FAQs.हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांचं नातं खरंच होतं का?हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांनी अधिकृत घोषणा केली नव्हती, मात्र अनेक घटना आणि सोशल मीडियामुळे चर्चा रंगल्या होत्या..हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट कधी झाला?२०२४ मध्ये परस्पर संमतीने दोघांनी घटस्फोट घेतला होता..जास्मिन वालिया कोण आहे?जास्मिन ही ब्रिटिश गायिका व टीव्ही कलाकार आहे, जी 'बॉम डिग्गी' गाण्यामुळे प्रसिद्ध झाली..जास्मिनचे काही प्रसिद्ध गाणे कोणती?'बॉम डिग्गी', 'डम डी डी डम', 'गर्ल लाइक मी', आणि 'टेंपल' ही तिची लोकप्रिय गाणी आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.