Jasprit Bumrah Advised To Take One Year Break
Mohammed Shami And Bhuvneshwar Kumar Replacement For Bumrah: भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आणखी एका मालिकेतून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जसप्रीत पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा निर्माण केली गेली होती. पण, अखेरच्या क्षणाला जसप्रीतने माघार घेतली आणि त्याच्या जागी कसोटी संघात आकिब नबीची निवड केली गेली. पण, जसप्रीतचे हे दुखणे वारंवार वाढत चालले आहे आणि त्याने यापूर्वीही अनेक मालिकांमधून माघार घेतली आहे. त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्याला अनेक सामन्यांत विश्रांतीही दिली गेली. पण, तरीही त्याला होणाऱ्या दुखापतीने चिंता वाढवली आहे.