जसप्रीत बुमराहचा जगात डंका! मानाचा पुरस्कार पटकावणारा पहिलाच भारतीय गोलंदाज; Smriti Mandhanaचाही गौरव

Jasprit Bumrah wins Wisden’s leading cricketer award 2025: भारतीय संघाचा जलजगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप जागतिक क्रिकेटवर उमटवली आहे. बुमराहला Wisden Men's Leading Cricketer in the World या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, हा गौरव मिळवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
JASPRIT BUMRAH
JASPRIT BUMRAH esakal
Updated on

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा Wisden Men's Leading Cricketer in the World या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. जसप्रीतने २०२४ वर्ष गाजवले. त्याने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या चार कसोटींत १९ विकेट्स घेतल्या. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जसप्रीतने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत एकट्याने भारताकडून लढतोय असे वाटत होते आणि त्याने सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात बांगालदेशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील दोन कसोटी सामन्यांत त्याच्या नावावर ११ विकेट्स राहिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com