

Jasprit Bumrah fitness report before Afghanistan series
esakal
BCCI MAKES BIG BACKUP PLAN BEFORE BUMRAH FITNESS REPORT: भारतीय संघाचा आगामी दौरा अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही दुखापतग्रस्त आहे. आता भारताला अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरायचं आहे. मात्र, बुमराहच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बुमराह संघात असला तरी त्याची उपलब्धता अद्याप फिटनेसवर अवलंबून आहे. त्यामुळे निवड समितीने पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली असून, युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला बॅकअप पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.