जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध मालिकेत फक्त ३ सामने खेळले आणि त्यात भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.
इरफान पठाणने बुमराहच्या कामगिरीला १० पैकी फक्त ६ गुण दिले आहेत.
बुमराहने मालिकेत १४ बळी घेतले असले तरी त्याची कामगिरी मॅच विनिंग ठरली नाही.
Irfan Pathan on Jasprit Bumrah’s England performance : भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावरील पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली असली तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहे. त्यापैकी एक म्हणजे जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडवरून सुरू झालेला वाद... मालिकेला रवाना होण्यापूर्वीच टीम इंडियाने जसप्रीत त्याच्यावरील वर्कलोडचे नियोजन करण्यासाठी फक्त तीन सामने खेळेल हे जाहीर केले गेले. त्यानुसार तो फक्त तीन सामने खेळलाही. पण, योगायोगाची गोष्ट म्हणजे तो ज्या तीन लढती खेळला, त्यापैकी एकही सामना भारताला जिंकता आला नाही.