लंडन : अगोदर ठरवल्याप्रमाणे जसप्रीत बुमरा इंग्लंड दौऱ्यातील तीन कसोटी खेळल्यानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले आहे. लवकरच तो मायदेशी परतेल, पण आता पुढचा सामना कधी खेळणार, हे अनिश्चित आहे..इंग्लंड दौऱ्यातील पाचवा कसोटी सामना ४ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर आशिया करंडक स्पर्धा आहे. ही स्पर्धा संपली की लगेचच वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका आहे. .आशिया करंडक स्पर्धा २९ सप्टेंबर रोजी संपणार आहे आणि लगेचच म्हणजे २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आणि १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका आहे..अशा परिस्थितीत बुमराला कोणत्या सामन्यात खेळवायचे हा महत्त्वाचा प्रश्न असेल. कसोटी अजिंक्यपद मालिकेत प्रगती करायची असेल, तर बुमराची आवश्यकता महत्त्वाची असेल, पण आशिया करंडकही तेवढाच प्रतिष्ठेचा आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका पुढे काही महिन्यांत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम असणार आहे..बुमरा आशिया करंडक स्पर्धेत खेळला, तर तो वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका निश्चितच खेळणार नाही, मात्र आफ्रिकेविरुद्ध तो खेळू शकेल, अखेर याबाबतचा निर्णय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना घ्यावा लागणार आहे..Table Tennis: आशियाई स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघांना २०२६ च्या जागतिक स्पर्धेसाठी प्रवेश.इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमरातीन कसोटी. ११९.४ षटके आणि १४ विकेटहेडिंग्ले आणि लॉर्डस कसोटीत एकाच डावात प्रत्येकी पाच विकेटकारकिर्दीत प्रथमच एकाच डावात १०० हून अधिक धावा दिल्या.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.