Jasprit Bumrah Retirement: 'जसप्रीत बुमराह निवृत्ती घेऊ शकतो, त्याच्याशिवाय कसोटी पाहण्याची सवय करून घ्या!' धक्कादायक दावा
भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करू शकत नाही, त्याच्या दुखापतीची लक्षणे स्पष्ट दिसतात.
मोहम्मद कैफने दावा केला आहे की बुमराह आगामी कसोटीत खेळणार नाही आणि कदाचित कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
बुमराहने मँचेस्टर कसोटीत 28 षटकांत 95 धावा देत फक्त 1 विकेट घेतली, त्याचा मारा प्रभावी दिसत नाही
Is Jasprit Bumrah retiring from Test cricket? भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करताना दिसत नाही. त्याला वेदना होत असल्याचे चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतेय आणि अशा परिस्थिती तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असा दावा केला जात आहे आणि यामागचं कारणही सांगितलं आहे. लॉर्ड्स कसोटीत ७ विकेट्स घेणारा जसप्रीत मँचेस्टरमध्ये २८ षटकांत ९५ धावा करून १ विकेट घेतली आहे. त्याचा मारा तितका प्रभावी दिसत नाही.
