
Jay Shah with Shahid Afridi Video Viral: दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रविवारी भारतविरूद्ध पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या या सामन्यासाठी अनेक सिलिब्रिटी व माजी क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली होती. सामना भारताने जिंकला, पण सामन्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आयसीसीचे अध्यक्ष जय शहा व पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी एकत्र सामना बघताना पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये दोघे गप्पा मारताना देखील दिसत आहेत. त्यांच्या सोबत भाजपचा एक प्रमुख नेता देखील पाहायला मिळत आहे.