
Cricket will be included in Olympics 2028: क्रिकेट या खेळाच्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आयसीसीचे चेअरमन जय शहा व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यामध्ये भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले असून, या बैठकीत २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिकपासून क्रिकेट हा खेळ सातत्याने ऑलिम्पिकमध्ये असावा याबाबत चर्चा झाल्याचे समजते.