Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Jay Shah: हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून वार्षिक करारातील अ श्रेणीमध्ये स्थान का देण्यात आल, याबाबत जय शाह यांनी खुलासा केला आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaSakal

Hardik Pandya BCCI Central Contract: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय पुरुष क्रिकेटपटूंसाठी वार्षिक मानधन करार जाहीर केला होता.

या करारात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला अ श्रेणीत स्थान देण्यात आले होते. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण आता यावर आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खुलासा केला आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक करार अ+, अ, ब आणि क अशा चार श्रेणींमध्ये विभागण्यात येतो. यामध्ये अ+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये, अ श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, ब गटातील खेळाडूंना 3 कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये देण्यात येतात.

Hardik Pandya
BCCI Central Contract : अय्यरला वगळले, हार्दिकला गोंजरले; पांड्याला न खेळता मिळाला वार्षिक करार... BCCIने केला अन्याय?

दरम्यान, कसोटी क्रिकेटपासून दूर असणाऱ्या हार्दिकला अ श्रेणीत कसे स्थान दिले, यावर प्रश्न विचारण्यात आले होते. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांनी खुलासा केला की हार्दिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार असल्याचे मान्य केले आहे, त्यानंतरच त्याला अ श्रेणीचा करार दिला आहे.

म्हणजेच आता हार्दिकला भारतीय संघाकडून खेळत नसताना देशांतर्गत क्रिकेटमधील टी20 आणि लिस्ट ए प्रकारातील स्पर्धांमध्ये खेळावे लागणार आहे.

भारतात विजय हजारे वनडे स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी अशा मर्यादीत षटकांच्या देशांतर्गत स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये हार्दकला सामील व्हावे लागणार आहे.

हार्दिक भारताकडून ऑक्टोबर 2023 नंतर खेळलेला नाही. तो ऑक्टोबर 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. पण आता तो जून 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघात पुनरागमन करेल. त्याची या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

Hardik Pandya
Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

दरम्यान, हार्दिक आयपीएल 2024 स्पर्धेत खेळत असून त्याच्याकडे या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारीही देण्यात आली. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात यंदा मुंबईला प्लेऑफ गाठण्यात अपयश आले आहे.

दरम्यान, जय शाह यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की देशांतर्गत क्रिकेटचे स्वरुप लवकरच जाहीर केले जाईल.

त्याचबरोबर जय शाह यांनी सांगितले की भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकपदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची जाहिरात लवकरत प्रकाशित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com