Auqib Nabi 60 wickets domestic cricket season
esakal
Ranji Trophy final J&K vs Karnataka match report: जम्मू-काश्मीरचा जलदगती गोलंदाज औकिब नबी याने रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्धच्या फायनलमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली. त्याने पाच विकेट्स घेत ८ वेळच्या रणजी विजेत्या कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवर गुंडाळला आणि जम्मू-काश्मीरला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. या कामगिरीसह त्याने रणजी करंडक स्पर्धेच्या या पर्वात ६० विकेट्स घेतल्या आणि उत्तराखंडच्या मयांक मिश्राला मागे टाकून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.