IND vs ENG 2nd ODI Joe Root match-winning knock
esakal
India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: जो रूटच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सन व साकिब महमूद यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाने संघाला कसेबसे २३३ धावांपर्यंत पोहोचवले. भारतीय गोलंदाजांनीही चांगली सुरूवात केली होती, परंतु जो रूट ( JOE ROOT ) शड्डू ठोकून उभा राहिला आणि इंग्लंडला सामना जिंकून दिला. त्याच्या नाबाद ९९ धावांच्या खेळीला विल जॅक्स, गस एटकिन्सन, सॅम कुरन, हॅरी ब्रूक यांची साथ लाभली.