Joe Root | ENG vs IND 5th TestSakal
Cricket
ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video
भारताविरुद्ध इंग्लंडकडून पाचव्या कसोटीत जो रुटने शतक केले. त्याने शतक पूर्ण केल्यानंतर डोक्याला बँड बांधत आकाशाकडे इशारा केला. त्याने असं का केलं जाणून घ्या.
भारत आणि इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर झाला. या सामन्याचा चौथा दिवस हॅरी ब्रुक आणि जो रुट यांनी शतकं करत गाजवला. दरम्यान, जो रुटने शतक केल्यानंतर अनोखं सेलिब्रेशन केलं, ज्याची सध्या चर्चा होत आहे.
या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने १०६ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी दमदार फलंदाजी केली.