
When John Wright grabbed Virender Sehwag by the collar : रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या वादाच्या बातम्या ड्रेसिंग रुममधून सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अशा बातम्या बाहेर सांगणार कोण, याचा शोध सुरू झाला. पण, या बातम्या व्हायरल करण्याचा हा ट्रेंड दिसतोय. यापूर्वीही ड्रेसिंग रुममध्ये बरेच वाद विवाद झाले, परंतु त्यावेळेस ते समोर आले नाही. खेळाडू निवृत्त झाल्यानंतर या घटनांचा तो उल्लेख करत असे. असाच एक प्रसंग वीरेंद्र सेहवागसोबत घडला होता आणि तो सौरव गांगुलीने सांगितला. भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी एकदा ड्रेसिंग रुममध्ये सेहवागची कॉलर पकडली होती आणि त्याला ठोसाही मारला होता. वीरूनेही त्याच्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.