जॉर्डन कॉक्सने ११ चौकार व ११ षटकारांची आतषबाजी करताना ६० चेंडूंत १३९ धावा चोपल्या.
जॉर्डन कॉक्सची नाबाद १३९ धावांची खेळी ही ट्वेंटी-२०मधील इंग्लंडच्या यष्टिरक्षक-फलंदाजांमध्ये सर्वोत्तम ठरली
लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार खेचून विजय निश्चित केला.
इंग्लंडमध्ये सध्या भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने हवा केली आहे. त्याच्या आक्रमक फटकेबाजीने इंग्लिश गोलंदाजांना बेजार केले आहे. अशात इंग्लंडचा २४ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज जॉर्डन कॉक्स ( Jordan Cox) चर्चेत आला आहे आणि त्याने T20 Blast मध्ये धडाकेबाज फटकेबाजी केली आहे. हॅम्पशायरविरुद्धच्या २२१ धावांचा पाठलाग करताना एसेक्सच्या जॉर्डनने आक्रमक फटकेबाजी केली.