Jos Buttler becomes first batter to score 15000 T20 runs
esakal
JOS BUTTLER FIRST BATTER TO SCORE 15,000 T20 RUNS : इंग्लंडचा माजी कर्णधार जॉस बटलरने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक झेप घेतली. श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२०त त्याने १६ चेंडूंत ३० धावांची खेळी करून या पराक्रमाला गवसणी घातली. तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५००० धावा करणारा फलंदाज बनला आहे. १५००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने ५२८ सामन्यांत ३५.४६ च्या सरासरीने ९ शतकं व १०७ अर्धशतकांसह या धावा केल्या आहेत. त्याने किरॉन पोलार्डचा १४९९९ धावांचा विक्रम मोडला.