Highest Run Getters in T20 : जॉस बटलरने इतिहास रचला, 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा विक्रम मोडला! जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला

10 Highest Run-Getters In T20 Cricket History: इंग्लंडचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज जॉस बटलर याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. द हंड्रेड २०२६ स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल याचा विक्रम मोडला.
Jos Buttler breaks Chris Gayle T20 runs record

Jos Buttler breaks Chris Gayle T20 runs record

esakal

Updated on

Jos Buttler breaks Chris Gayle T20 runs record: इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉस बटलर याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याला मागे सोडून जगात दुसरे स्थान पटकावले. द हंड्रेड ट्वेंटी-२० लीगमधील मँचेस्टर सुपर जायंट्स आणि लंडन स्पीरिट यांच्या लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात बटलरने हा विक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com